डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

डोळे आपल्या शरीरामधील अत्यंत महत्वाचे आणि संवेदनशील असे ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यांमुळेच आपण हे जग बघू शकतो, डोळ्यांमुळेच आपल्याला विविध गोष्टींचा अनुभव घेता येतो,जगाचे सौंदर्य अनुभवता येते. म्हणूनच डोळ्यांची योग्य काळजी घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.या ब्लॉगमध्ये, आपण डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत, त्या टिप्स नक्की फॉलो करा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. चला तर सुरुवात करूया.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स (Tips for eye care:) :

1. डोळ्यांची नियमित तपासणी करावी :

हल्ली अगदी लहान मुलांना सुद्धा लवकर चष्मा लागतो, त्याला वेगवेगळी कारणे असू शकतात. आपल्या डोळ्यांचे आरोग्य कसे आहे हे जाणून घेण्यासाठी नेत्र तज्ञांकडून वेळोवेळी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. वर्षभरामधून किमान एकदा तरी डोळ्यांची तपासणी करावी यामुळे डोळ्यांची कुठलीही समस्या असेल तर त्याचे लवकर निदान होऊ शकते आणि त्यावर उपचार करणे सुद्धा सोपे जाते.

2. योग्य प्रकाशाचा वापर करावा :

कुठलेही काम करत असताना प्रकाश योग्य असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ,वाचन करत असल्यास योग्य प्रकाश असणे गरजेचे आहे जर जास्त अंधारामध्ये किंवा गडद ठिकाणी वाचन केले तर डोळ्यांवर ताण पडू शकतो तसेच जर प्रकाश जास्तच तीव्र असेल तरीसुद्धा डोळ्यांना त्रास जाणवू शकतो त्यामुळे योग्य प्रकाशाचा वापर करावा. तसेच संगणकावर काम करत असल्यास त्या ठिकाणी योग्य प्रकाश असणे आवश्यक आहे.

3. “20-20-20” नियमाचे पालन करा.

संगणकावर किंवा डिजिटल स्क्रीनवर काही काम करत असल्यास “20-20-20” नियमाचे पालन करा म्हणजेच प्रत्येक 20 मिनिटांनी किमान 20 सेकंदांसाठी 20 फूट लांब काहीतरी बघा, असे केल्यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होईल तसेच डोळ्यांना काही वेळासाठी डिजिटल स्क्रीन पासून ब्रेक मिळेल.

4. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा :

घराबाहेर पडत असताना युवी प्रोटेक्शन करण्यासाठी सनग्लासेसचा वापर करावा. सनग्लासेस वापरल्यामुळे यूव्ही किरणांपासून तसेच तीव्र सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते.

5. आहार आणि पोषण व्यवस्थित घ्या :

योग्य पद्धतीने आहार घेणे आपल्या संपूर्ण शरीरासाठी आणि त्यासोबतच डोळ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.आपल्या आहारामध्ये अधिक भाज्या, फळे, विशेषतः गाजर, पालक, आणि ब्लूबेरी यांचा समावेश करावा. ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन सी, ई चा समावेश सुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

6. धूम्रपान करणे टाळावे :

धूम्रपान करणे हे पूर्ण शरीरासाठी घतक आहे तसेच धूम्रपान केल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर सुद्धा नकारात्मक परिणाम दिसून येतात त्यामुळे धूम्रपान करणे टाळावे आणि एक आरोग्यदायी अशी जीवनशैली अंगीकारावी. धुम्रपानापासून दूर राहा, आपले आरोग्य सांभाळा !

7. पुरेसे पाणी पिणे :

दररोज आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे, साधारणतः तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक आहे यामुळे शरीरामधील आर्द्रता टिकून राहते, ज्यामुळे डोळे सुद्धा आर्द्र राहतात.

8. डोळ्यांची स्वच्छता महत्त्वाचे आहे :

डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळावे. डोळ्यांवर हात लावण्यापूर्वी किंवा डोळ्यांना स्पर्श करत असताना आपले हात स्वच्छ आहेत याची काळजी घ्यावी आणि म्हणूनच वारंवार हात धुण्याची सवय असावी. जर अस्वच्छ हात डोळ्यांवर लागले तर डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते म्हणूनच हात स्वच्छ धुवावे तसे वारंवार करणे शक्य नसल्यास डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळावे.

9. पुरेशी झोप घ्यावी :

शरीरासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. कमी झोप झाल्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा जाणवतो आणि त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो. यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे सुद्धा पडू शकतात म्हणूनच रोज किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.

10. डोळ्यांची विश्रांती सुद्धा महत्वाची आहे :

जास्त वेळ काम केल्यानंतर डोळ्यांना विश्रांती देणे सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे डोळ्यांवर पांढरे कापड किंवा थंड कापड ठेवल्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

11. डोळ्यांचा मेकअप :

मुलींना मेकअप करणे आवडते परंतु काही मुली दिवसभरामध्ये मेकअप करतात आणि तो मेकअप रात्री न काढता तशाच झोपतात, याचा परिणाम त्वचेवर आणि डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप करत असताना योग्य ब्रांडचे प्रॉडक्ट निवडावे आणि मेकअप केल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हा मेकअप काढून ठेवावा, असे केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल.

12. डोळ्यांच्या दृष्टीतील बदलांचे निरीक्षण करा :

डोळ्यांच्या दृष्टीतील बदलांचे निरीक्षण करा, डोळ्यांच्या दृष्टी मधील बदल म्हणजेच अंधुक दृष्टी, दुहेरी दृष्टी,डोळे लाल होणे, फ्लोटर्स, डोळे सुजणे अशा काही डोळ्यांच्या समस्या. 

    डोळ्यांच्या दृष्टीमध्ये असे काही बदल जाणवल्यास किंवा डोळ्यांच्या इतर काही समस्या जाणवल्यास नक्कीच स्थानिक डॉक्टरांशी संपर्क करू शकता किंवा प्रीज्मा आय केअर , यांच्याशी संपर्क साधू शकता. https://prismaeyecare.com/  ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे यावरून अधिक माहिती मिळवू शकता. डोळ्यांची काळजी घेणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. वरील टिप्स आणि सवयींना आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्यास, तुम्ही तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता. आपल्या डोळ्यांना प्रेम करा आणि त्यांची काळजी घेणे विसरू नका!

Contact Info

Location

Copyright © 2024 Prisma Eye Care